कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली मॉर्निंग क्रिक्रेट क्लबचे सदस्य अनिल हळदीवे यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाढदिवस अभिष्टचिंतनाचा भला मोठा बॅनर झळकला. एमसीसी अर्थात मॉर्निंग क्रिक्रेट क्लब च्या सर्व सदस्यांचे फोटो आणि नावांसह हा बॅनर झळकला असला तरी अनिल हळदीवे यांना शुभेच्छा देतांनाचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंची छबी मोठी असलेला हा बॅनर असल्यामुळे साहजिकच त्यातून राजकीय अर्थ काढत कणकवली शहरात नाक्यानाक्यावर चर्चा रंगली. अनिल हळदीवे हे कै. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक.अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्तिनिष्ठ राहून शिवसेनेतून बाहेर पडत पक्षबदल केला.मात्र अनिल हळदीवे यांनी मात्र शिवसेनेशी इमान कायम ठेवत शिवसेनेचा भगवा कधीच खांद्यावरून उतरवला नाही.आजही ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचेच शिवसैनिक आहेत. तर बॅनर वर शुभेच्छा देतांनाचा समीर नलावडें च्या मोठ्या फोटोवरून कणकवलीत अनेक राजकीय अर्थ बोलले जाऊ लागले.कारण समीर नलावडें हे राणे समर्थक भाजपा चे माजी नगराध्यक्ष. त्यामुळे कट्टर शिवसैनिक असलेल्या हळदीवे ना शुभेच्छा देताना मॉर्निंग क्रिक्रेट क्लब च्या अन्य सदस्यांप्रमाणे समीर नलावडें चा फोटो न ठेवता सर्वात वरती आणि मोठा फोटो असलेल्या नलावडें च्या फोटोमुळे राजकीय अर्थही काढण्यात आले. आणि असे अर्थ काढणेंही साहजिकच आहे कारण कणकवली नगरपंचायत चा कार्यकाल संपून नगरपंचायत निवडणूक कधी लागतेय याचीच सगळे राजकीय पक्ष वाट बघत आहेत. आणि ह्या पार्श्वभूमीवर हळदीवेंच्या वाढदिवसाचा समीर नलावडें च्या मोठ्या फोटोसह लागलेला बॅनर हा कणकवली शहराच्या राजकीय क्षेत्रात चांगलीच घालमेल आणि खळबळ माजवून गेला. चर्चा अशीही आहे की नलावडे विरोधक पक्षात त्या बॅनर वरून मोठी शाब्दिक घमासान झाली, कारण त्यातून राजकीय अर्थ प्रेरित होतो. पण अनिल हळदीवे म्हणजे तोंडावर स्पष्टपणे सडेतोड बोलणारा माणूस हे सर्वश्रुत असल्याने त्या बॅनर वरून पाठीमागे तोंडफाड चर्चा झाली तरी नलावडें चा मोठा फोटो का लावण्यात आला अशी विचारणा मात्र करण्यात आली नाही.मात्र काहीही असले तरी कणकवलीत त्या बॅनरमुळे राजकीय घालमेल मात्र झालेली दिसून आली.