कुडाळ (प्रतिनिधी) : भाजपच्या कुडाळ तालुकाध्यक्षपदी संजय वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ही निवड जाहीर केली आहे. या संदर्भाचे पत्र नूतन तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांना दिले आहे. या निवडीनंतर संजय वेंगुर्लेकर यांचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत देसाई, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेर्से, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर,मावळते तालुकाध्यक्ष विनायक राणे, माजी सभापती बंड्या मांडकुलकर,ओरस मंडल अध्यक्ष दादा साईल,कुडाळ नगरपंचायत चे भाजपचे गटनेते विलास कुडाळकर, माजी सभापती किशोर मर्गज,राकेश कांदे यांनी अभिनंदन केले आहे. नारायण राणे यांचे जुने कट्टर समर्थक असलेले संजय वेंगुर्लेकर हे ग्रामीण भागातील एक हरहुन्नरी नेतृत्व म्हणून ओळखले जाते.