खारेपाटण मभुबन हॉटेल जवळ टाटा – इंडगो कार ला अपघात

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे आज सायंकाळी ४.४५ वाजता मुंबई वरुन आलेली व गोव्याच्या दिशेने जाणारी टाटा इंडिगो मांझा कंपनीची चार चाकी कार वाहन क्र. – एम एच ०१- ए आर ०७८२ ही खारेपाटण मधुबन हॉटेल जवळील अवघड वळणावर आली असता वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने डायव्हरशन दुभाजकवर आदळल्याने अपघात झाला. ही घटना सायंकाळी ४.४५ वाजता खारेपाटण ब्रिजवर मधुबन हॉटेल जवळ घडली.

टाटा इंडिगो माझा ही गाडी चालक गोम्स लुईस हे चालवत होते.व ते गोवा येथे चालले होते. त्यांच्यासमवेत गाडीत जॉन गोम्स व ऐवटन गोम्स हे प्रवास करत होते.यामध्ये गोम्स एवटन हे किरकोळ जखमी झाले. खारेपाटण येथील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर मधुबन हॉटेल नाजिक मुख्य ब्रीज वर डायव्हरशन मोडचा अंदाज चालकाला न आल्याने गाडी दुभाजकावर आदळली. यामध्ये गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली.तर खारेपाटण पोलीस दूरशेत्राचे पोलीस कर्मचारी श्री पराग मोहिते यांनी अपघात ठिकाणी भेट देऊन अपघाताची माहिती जाणून घेतली.
आतापर्यंत २३ वा अपघात
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण मधुबन हॉटेल जवळ अवघड वळणावर आजपर्यंत २२ अपघात झाले असून आज घडलेला २३ वा अपघात आहे. हायवे प्राधिकरण ने खारेपाटण मध्ये चुकीच्या पद्धतीने महामामार्गाचे काम केले असून बऱ्याच ठिकाणी अवघड वळण ठेवल्यामुळे तसेच पुरेसे व अत्यावश्यक जागा असणारे
सर्व्हिस रोड न ठेवल्यामुळे खारेपाटण मध्ये वारंवार अपघात घडत आहे.याला बांधकाम विभाग व हायवे प्राधिकरण जबाबदार असल्याचे खारेपाटण माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी सांगितले.

खारेपाटण मधील अपघात रोखण्यासाठी हायवे प्राधिकरणाच्या अधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे असून,अजून किती जणांचे न प्राण घेण्याची वाट हायवे प्राधिकरण वाट पाहत आहे.असा सवाल नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!