चक्क रिमझिम पावसात जून महिन्यात डांबरीकरण …फणसगाव रस्त्यावर पिडब्ल्यूडी चा प्रताप

निकृष्ट दर्जाची जबाबदारी कोण घेणार ? बंड्या नारकर यांचा सवाल

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे तिठा ते पडेल दरम्यान फणसगाव रस्त्यावर जून महिन्यात चक्क रिमझिम पावसात डांबरीकरण सुरू आहे.पिडब्ल्यूडी च्या या भोंगळ कारभाराची आणि ऐन पावसाळ्यात होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणा ची जबाबदारी कोण घेणार ? ऐन पावसाळ्यात जून महिन्यात 13 तारीख ला रिमझिम पावसात सुरू केलेले हा डांबरीकरण किती दिवस टिकणार ? या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणा ची जबाबदारी कोण घेणार ? हा सवाल फणसगाव येथील भाजपा कार्यकर्ता महेश उर्फ बंड्या नारकर यांनी केला आहे. पावसाळ्या आधी रस्ते डांबरीकरण ची कामे करण्याचे निर्देश असतानाही भर रिमझिम पावसात जून महिन्यात कोणाच्या आशीर्वादाने हे डांबरीकरण सुरु आहे ? लाखो रुपयांचा निधी केवळ खर्च करायचा म्हणून ऐन पावसाळ्यात जर पिडब्ल्यूडी चे अभियंता ठेकेदाराला रिमझिम पावसात डांबरीकरण करू देत असतील आणि ह्या निकृष्ट होणाऱ्या कामाचे बिलही देणार असतील तर जनतेने कर रूपाने दिलेल्या निधीची ही उधळपट्टी आहे. ऐन पावसात डांबरीकरण करण्याचे धाडस ठेकेदार करतात यामागे पिडब्ल्यूडी चे अभियंता आणि ठेकेदार यांचे साटेलोटे असल्याचा आरोप बंड्या नारकर यांनी केला आहे.या प्रकाराची दखल कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड घेणार की नाही ? असा सवाल फणसगाववासीयांतून उमटत आहे.

error: Content is protected !!