आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मोती तलावाकाठी दोन युवकांत झाली मारामारी; दोघांचीही तक्रार नसल्याने प्रकरण निकाली

रात्रीच्यावेळी शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी सावंतवाडी (प्रतिनिधी) : गुरुवारी रात्री शहरातील मोती तलावाच्या काठावर जोरदार “फ्री-स्टाईल” हाणामारी झाल्याची घटना घडून आली आहे. या हाणामारीचे कारण समजू शकले नाही. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.…

‘त्या’ बेपत्ता खलाशाचा मृतदेह आढळला देवगड खाडीत

देवगड (प्रतिनिधी) : देवगड बंदरातील सुश्मिता सोनू चौगुले यांच्या मालकीच्या विद्या गणपत या मच्छीमारी नौकेवर एकनाथ पांडुरंग शिवगण वय ४५ राहणार मालगुंड तालुका रत्नागिरी हा खलाशी म्हणून कामाला होता. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास तो बोटीवरून खाली पाण्यात पडला.…

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजने मधून खारेपाटण विभागातील विविध विकास कामांसाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर

पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांचे बाळा जठार यांनी जनतेच्या वतीने मानले आभार खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन – २०२२-२३ क वर्ग यात्रास्थळ विकास…

सावंतवाडीत अंगणवाडी व मिनी अंगणवाडी सेविका भरती..

सावंतवाडी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माध्यमातून बाल विकास प्रकल्प योजने अंतर्गत सावंतवाडीत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस ही पदे मानधन तत्वावर भरती करण्यात येत आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराने तालुका बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे…

सायली परब यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : आचरे-समर्थनगर येथील रहिवासी व मूळच्या मुणगे-कारिवणेवाडी येथील सायली सुनिल परब 52 यांचे अल्पशा आजाराने बुधवार 22फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचरादरम्यान त्यांचे निधन झाले.भूमिअभिलेख कणकवली कार्यालयाचे सेवानिवृत्त अधिकारी सुनिल परब…

जप्त केलेल्या हजारो ब्रास वाळूचा 28 रोजी लिलाव

मालवण (प्रतिनिधी) : महिन्याभरापूर्वी मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने महिन्याभरापूर्वी देवली येथील माळरानावर वाळू वाहतूक करणारे २८ डंपर पकडतानाच ३३२ ब्रास अनधिकृत वाळूचा साठा जप्त केला होता. तर आंबेरी येथे १, १४४ ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त…

अपघाताला निमंत्रण देतायत करुळ घाटातील खड्डे

तातडीने खड्डे बुजविण्याची रफीक नाईक यांची मागणी खारेपाटण (प्रतिनिधी) : राज्य महामार्ग म्हणून कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा विजयदुर्ग तरळा कोल्हापूर या मार्गावरील करूळ घाटात सद्या सर्वत्र खड्डे पडले असून यामुळे भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने करूळ…

जिल्ह्यात ४ मार्चपर्यंत मनाई आदेश : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार…

अखेर मुख्याधिकारी सुरज कांबळे जेसीबीसह ॲक्शन मोडवर

वैभववाडी शहरातील अनधिकृत स्टॉल जेसीबी च्या सहाय्याने हटविण्यास सुरवात जेसीबी च्या सहाय्याने स्टॉल हटविताना स्टॉल धारकांचे अश्रु अनावर वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील स्टॉल धारकांनी आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्या मग आम्ही स्टॉल हटवितो असा आक्रमक पवित्रा घेत नगरपंचायत…

काळसे, धामापूर हद्दीतील रस्त्यावर गतिरोधक घालण्यास सुरुवात; सरपंच, ग्रामस्थांच्या मागणीला यश

आमदार वैभव नाईक, माजी खासदार निलेश राणे यांचेही प्रयत्न. चौके (प्रतिनिधी) : मालवण – चौके – कुडाळ या मार्गावर काळसे आणि धामापूर गावच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावर आज दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार ठीकठिकाणी गतिरोधक…

error: Content is protected !!