जागतिक महिला दिनी अमृतमहोत्सवी वाढदिवस केला साजरा ; पुरळ केळयेवाडीत अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा

देवगड (प्रतिनिधी) : महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी केळये ग्रामस्थ महिला मंडळाने पुरळ केळयेवाडी येथील वनिता दत्ताराम गावकर या 75 वर्षाच्या महिलेचे केक कापून व भेटवस्तू देवून अनोख्या पध्दतीने महिला दिना निमित्त महिला दिन साजरा करण्यात आला. 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त केळयेवाडी येथील वनिता दत्ताराम गावकर (75) हिचा केक कापूस तिला भेटवस्तू देवून एक वेगळया पध्दतीने महिला दिन साजरा करण्यात आला. तिच्या जीवनामधील एक उर्जावस्थिती मिळण्यासाठी व वृध्दापन विसरुन आनंदाच्या प्रवाहात खेचण्यासाठी केळयेवाडीमधील महिलांनी असा आगळा वेगळा महिला दिन साजरा केला. यामुळे या 75 वर्षीय महिलेच आनंद गगनाला भिडला होता. ग्रामीण भागामध्ये राहणा-या वयोवृध्द लोकांना महिला दिन म्हणजे काय याची माहितीच नसते मात्र अश्या अनोख्या पध्दतीने महिला दिनाच्या कौतुकाची थाप त्या महिलेच्या पाठीवरती पडते तेव्हा तीचा आनंद अश्रृनयनाने भरुन येवून तिच्या तोंडुन सर्व निरोगी राहून निर्घायुष्य व्हा असे आपोआप शब्द बाहेर आल्याने ख-या अर्थाने साक्षात्कार झाल्याचाही आनंद सर्वांना मिळत होता.

error: Content is protected !!