आचरा (प्रतिनिधी) : ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. याचेच औचित्य साधत युवासेना जिल्हा प्रमुख(शिंदे गट) ऋत्विक सामंत ( कुडाळ-मालवण) व युवतीसेना जिल्हा प्रमुख कुडाळ-मालवण(शिंदे गट ) सोनाली पाटकर यांनी स्नेहलता सेवा सदन अंतर्गत, विद्याभारती संचलित स्नेहशिल्प शिशुवाटीका मोडका वड, चिंदरकरवाडी, पिंगुळी. ता. कुडाळ येथे आदिवासी समाजातील मुलींच्या वसतिगृह मध्ये जाऊन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात केला त्या वेळी फळ भाज्या जिवनावश्यक वस्तू आणि खाऊ यांचे वाटप केले, महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारी घेतली आहे. समाजात महिलांना समान अधिकार मिळावेत, प्रत्येक महिलेला त्यांचे हक्क मिळवून देणे तसेच कोणत्याही क्षेत्रात महिलांवर होणारा भेदभाव रोखण्याच्या उद्देशानेही हा दिवस साजरा केला जातो. युवा सेनेने यावेळी महिलांना शुभेच्छा दिल्या.यावेळी यशवर्धन राणे, नूपूर सामंत, भालचंद्र कुबल, किशोरी कोळेकर आदी उपस्थित होते.













