आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बांदिवडे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

बांदिवडे ग्रामस्थ संघ स्थानिक समिती यांचे आयोजन २१ रक्तदात्यांनी केले रक्ताचे पुण्यदान आचरा (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बांदिवडे ग्रामस्थ संघ स्थानिक समिती यांच्या वतीने रविवार १५ फेब्रुवारी रोजी बांदिवडे जिल्हा परिषद शाळा नं २ येथे आयोजित रक्तदान…

जि. प. केंद्रशाळा बांदा नं 1 येथील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे आयोजन; १०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग बांदा (प्रतिनिधी) : येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं 1 येथे आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तीन शालेय गटांसह खुल्या गटात…

नवनिर्वाचित जि प सदस्य मनोज रावराणे, पं स सदस्य मानसी मराठे यांचा घोणसरी चर्च मध्ये सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ जिल्हा परिषद मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे आणि लोरे पं स मतदारसंघातून रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी झालेल्या पं स सदस्य मानसी मराठे यांचा घोणसरी येथील सेंट सेबेस्टिन चॅपेल येथे फादर मनवेल…

भक्तिमय वातावरणात साजरा प. पू. भालचंद्र महाराज संस्थान येथे महाशिवरात्र उत्सव…!

शहरातून काढण्यात आली पालखी मिरवणूक…! दैनंदिन आरतीने उत्सवाची सांगता…! कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात रविवारी महाशिवरात्र उत्सव भक्तिभावात साजरा करण्यात आला. बाबांच्या समाधीस्थळी विविध फुलांनी सजावट करण्यात आली होती. यामुळे बाबांची मूर्ती लक्ष वेधून घेत…

भक्तिभावात साजरा श्री देव काशिविश्वेश्वर मंदिर येथे महाशिवरात्र उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील श्री देव काशिविश्वेश्वर मंदिरात रविवारी महाशिवरात्र उत्सव भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर शिवमय झाला होता. मंदिरात शिवशंभुची मूर्ती ठेवून विद्युत रोषणाई तसेच रंगीबिरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती.…

जिल्ह्यात सर्व तालुक्यात उर्जा मित्र बैठकांचे १८ फेब्रुवारी रोजी आयोजन आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आठही तालुका आणि उपविभाग स्तरावर बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी पहिल्या उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्या वेळेवर मार्गी लावण्यासाठी तसेच विज ग्राहक आणि विज अधिकारी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी…

वैभववाडी महाविद्यालयाच्या शुभम हळदीवेचे यश

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या ठाणे झोन क्रीडा समिती व टी. झेड. ए. एस. पी. मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगती कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, डोंबिवली (पूर्व) येथे १३ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित इंटर कॉलेजिएट बेस्ट फिजिक (शरीर सौष्ठव) पुरुष…

चार सेंटीमीटरच्या बेलाच्या पानावर साकारला शंकर

नाधवड्यातील सचिन मिस्त्रीची अनोखी कलाकृती वैभववाडी (प्रतिनिधी) : अत्यंत सूक्ष्म आणि देखण्या पद्धतीने साक्षात भगवान शंकर महादेवाचे चित्र अवघ्या चार सेंटीमीटरच्या बेलाच्या पानावर रेखाटत नाधवडे (महादेववाडी) येथील सचिन मिस्त्री याने आपल्या कलेची झलक दाखवून दिली आहे. त्याच्या या अनोख्या आणि…

‘कुणकेश्वराच्या विकासासाठी कटीबद्ध; अधिकाधिक निधी देणार’ – पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

कोकण काशी कुणकेश्वरचे ना. नितेश राणेंनी घेतले दर्शन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोकणाची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वरच्या यात्रेला अनेक वर्षांपासून मी नियमितपणे दर्शनासाठी येत आहे. श्री कुणकेश्वराचे दर्शन घेणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सार्वजनिक आणि…

श्री देव बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री सोहळा उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथील प्रसिद्ध व जागृत अशा स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत महाशिवरात्री रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी असून पूर्वसंध्येला…

error: Content is protected !!