पोईप (प्रतिनिधी) : आयुष्मान आरोग्य मंदिर मसदे, विवेकानंद नेत्र रुग्णालय व पिरामल स्वास्थ यांच्या सहकार्याने गुरुवार दिनांक 09/04/2026 रोजी श्री. स्वामी समर्थ मठ, मसदे येथे सकाळी 10 ते 1 वा या वेळेत मोफत रक्त तपासणी, नेत्र तपासणी व मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी उच्च रक्तदाब, मधुमेह तपासणी, तसेच स्ञियांसाठी गर्भाशय मुखाच्या कॅन्सर तपासणी कॅल्शियम तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी, थायरॉईड तपासणी, कॉलेस्ट्रॉल तपासणी, किडनी फंक्शन टेस्ट, थायरॉईड व कॉलेस्ट्रॉल तपासणी करीता उपाशी पोटी येणे. तसेच नेत्र तपासणी शिबिर वैशिष्ट्ये दृष्टिक्षमता व नजर तपासणी, डोळ्यांच्या तिरळेपणाची तपासणी, मोतीबिंदू तपासणी, मशिनद्वारे चष्मा नंबर तपासणी उच्च रक्तदाब व मधुमेह आजाराच्या उपलब्ध असलेल्या गोळ्या मोफत मिळतील. तपासणी करिता येताना सद्यस्थितीत चालू असलेल्या गोळ्या सोबत घेऊन येणे.
श्रीस्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन












