खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील भारतीय जनता पार्टी चे युवा कार्यकर्ते तेजस राऊत यांनी नुकतीच आपल्या वाढदिवशी माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांची त्यांच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले.यावेळी खासदार राणे यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तेजस राऊत हे खारेपाटण शिवसेना उभाठा पक्षाचे युवा कार्यकर्ते म्हणून खारेपाटण मध्ये सक्रीय होते.परंतु सहा महिन्यापूर्वीच त्यांनी नामदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित भाजप पक्षात प्रवेश केला होता.त्यापासून ते भाजप पक्षाचे कार्यकर्ते म्हणुन काम करत असून आपल्या वाढदिवसा औचित्य साधून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची देखील भेट घेतली.यावेळी संजय पडते अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. नामदार नितेश राणे यांनी तेजस राऊत याचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











