कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही – जयेंद्र रावराणे

एकजुटीची वज्रमूठ कायम ठेवूया व कामगार हित जपुया-अशोक सावंत

वैभववाडीत कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी बैठक संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे सभा संपन्न झाली. १ एप्रिल पासून काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले होते. त्यांना पुन्हा कामावर कसे हजर करता येईल यासंदर्भात यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. कंत्राटी कामगारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. काम करत असताना ग्राहकांना तुमच्या कामातून चांगल्या सेवा मिळाल्या पाहीजेत तुमच्या कामातुन त्यांना समाधान मिळाले पाहिजे.

चांगल्या प्रकारे सेवा देत असताना आपलं काम जोखीमीचे असल्या कारणाने आपण कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ न करता डोक शांत ठेवून काम करावं. कामगारांना भविष्यात काही अडचणी आल्यास आपण ठामपणे कामगारांच्या पाठीशी राहू असे मत वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. तर संघटनेसाठी कामगारांचे हीत सर्वप्रथम असेल त्यासाठी संघटनेवर विश्वास ठेवून एकजुटीची वज्रमुठ कायम ठेवुया व कामगार हीत जपुया असे संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी अध्यक्षीय भाषणातून यावेळी स्पष्ट केले.

सिंधूदर्ग जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन देण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला प्रमूख मार्गदर्शक म्हणून अशोक सावंत वैभववाडीतील जयेंद्र रावराणे. केंद्रीय कार्यकारिणी सचिव आनंद लाड, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर आणि ठेकेदार समाधान चव्हाण उपस्थित होते. तसेच वैभववाडीचे पदाधिकारी दिनेश तांबे अजीम ठाणगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बैठकीच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.या बैठकीत तालुक्यातील सर्व तांत्रिक कर्मचारी. ऑपरेटर्स आणि कंत्रारटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!