आर के डान्स अकादमी चा कणकवलीत शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : येथे ‘आर. के. डांस अकादमी चा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. या अकादमीमध्ये सेमी क्लासिकल, लोकनृत्य, बॉलिवूड, वेस्टर्न नृत्य यांसह महिला आणि पुरुषांसाठी जुबा नृत्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. नृत्यदिग्दर्शक राहुल राजदत्त कदम यांनी सर्व नृत्यप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. अकादमीचा पत्ता बेलवलकर ज्वेलर्स समोर, ईशा कलेक्शनच्या वरती असा आहे. अधिक माहितीसाठी 9356981454 आणि 7378945542 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. या उ‌द्घाटन सोहळ्यास आणि सौ पारकर, रश्मी मंदार कदम (शास्त्रज्ञ, मुंबई मेट्रो), सहायक नृत्यदिग्दर्शक संदीप सोनम, पूनम तांबे, प्रियेश पवार, यश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच ‘अस्सल मालवणी क्रिएशन टीमने भेट देऊन शुभेच्छा दिल्या कणकवलीतील नृत्यप्रेमींसाठी ही अकादमी एक नवीन आणि उत्तम व्यासपीठ ठरणार आहे.

error: Content is protected !!