आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शरद पवार गटाला मिळालं नवं नाव

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ ब्युरो न्युज (मुंबई) : शरद पवार गटाला नवं नाव मिळालंय. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ असं नवं नाव पवार गटाला मिळालंय. राज्यसभा निवडणुकीसाठी हे नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे नवीन…

भ्रष्ट तलाठ्याला आ. वैभव नाईक यांचा दणका; तडकाफडकी झाली बदली

कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी राज्य शासनाचे महसूल विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ च्या तरतुदीअंतर्गत कुडाळ तालुक्यातील वालावल सजाचे तलाठी किरण सुधाकर सोनवणे यांची गोठोस तलाठी सजा…

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय तसेच नॅस्कॉम च्या सहकार्याने लहान व मध्यम व्यावसायिकांसाठी १० फेब्रुवारी रोजी ओरोस येथे कार्यशाळेचे आयोजन

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन. सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय व नॅस्कॉमच्या सहकार्याने १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता शरद कृषी भवन ओरस येथे लहान व मध्यम उद्योग व्यवसायिकांसाठी एम.एस.एम.एस.ई सशक्तीकरण रणनीतीक…

कणकवली,विधानसभा मतदारसंघातुन पहिल्या टप्प्यात २३८ रामभक्त जाणार अयोध्येला

अयोध्येला जाण्यासाठी पनवेल ते अयोध्या विशेष रेल्वे गाडी राम भक्तांसाठी आयोध्या वारी घडविण्यास आ. नितेश राणे यांनी दिली मोफत सेवा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली, देवगड व वैभववाडी मतदार संघातुन २३८ रामभक्त अयोध्येला जाणार आहेत. भाजपा प्रदेश कार्यालयाकडून अयोध्येला जाण्यासाठी पनवेल…

मसुरे मार्गाचीतड येथे माघी गणेश जयंती उत्सव!

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे मार्गाचीतड येथील श्री महागणपती मंदिर येथे १२ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत श्री महागणपती विश्वस्त मंडळाच्या वतीने “माघी श्री गणेश जयंती” उत्सव साजरा करण्यात येत आहे. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ०८.०० ते ०८.३० वा.श्री महागणपती पूजा…

देऊळवाडा प्राथमिक शाळेत पुस्तक प्रदर्शन व वाचन मेळा संपन्न!

माळगाव ग्रंथालयाच्या वतीने आयोजन मसुरे (प्रतिनिधी) : वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या हेतूने माळगाव पंचक्रोशी ज्ञान प्रसारक मंडळ ग्रंथालय माळगाव यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा या शाळेत आज ‘पुस्तक प्रदर्शन व वाचन मेळा’ आयोजित करण्यात आला…

वेंगुर्ले भाजपा महीला मोर्चाच्या वतीने नुतन पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत !

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : सर्व जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेले पोलिस हे न्यायाचे रक्षक आणि अन्यायाचे भक्षक असतात. सभोवताली पोलिस दिसला की सर्वाना सुरक्षित वाटू लागते. एक पोलिस अधिकाऱ्याचे जीवन अनेक संकटे आणि शौर्याने भरलेले असते. परंतु संकटे आणि जोखमीला न घाबरता…

देवगड तहसीलदार आर. जे. पवार यांची मुंबई उपनगर अंधेरी येथे बदली

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तहसीलदार आर. जे. पवार यांची प्रशासकीय बदली झाली आहे.त्यांची मुंबई उपनगर अंधेरी येथील संजय गांधी योजना तहसीलदारपदी बदली झाली आहे.तहसीलदार यांची ही पवार बदली प्रशासकीय असून सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये त्यांनी सलग चार वर्षे काम केले होते. कणकवली…

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक पदी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड

कोकण विभागातील शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार – प्रमोद रावराणे वैभववाडी (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालास चांगला भाव मिळवून देण्यासाठी पणन महासंघ काम करतो महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक मंडळाच्या सन 2023 ते 2028 च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 9…

केळवली पंचक्रोशी वैश्य समाजाच्या वतीने प.पू.गगनगिरी सेवाश्रम येथे श्री.श्री.वामनाश्रम महास्वामीजी यांच्या प्रतिमा पूजनाचा सत्संग सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

खारेपाटण (प्रतिनिधी) : वैश्यगुरू प. पू.श्री श्री वामनाश्रम महास्वामीजींचे आज्ञेनुसार गगनगिरी सेवाश्रम केळवली येथे केळवली, मोरोशी,मोसम , कोंडोशी,निखरे, हसोळ पंचक्रोशीतील वैश्य बांधवांच्या वतीने मंगळवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. श्री.श्री.वामनाश्रम महस्वामीजी यांचे प्रतिमेची पूजाअर्चा करून गुरू सत्संग…

error: Content is protected !!