खारेपाटण (प्रतिनिधी) : वैश्यगुरू प. पू.श्री श्री वामनाश्रम महास्वामीजींचे आज्ञेनुसार गगनगिरी सेवाश्रम केळवली येथे केळवली, मोरोशी,मोसम , कोंडोशी,निखरे, हसोळ पंचक्रोशीतील वैश्य बांधवांच्या वतीने मंगळवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. श्री.श्री.वामनाश्रम महस्वामीजी यांचे प्रतिमेची पूजाअर्चा करून गुरू सत्संग सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सर्व वैश्य बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. सकाळी अकरा वाजता श्री श्री वामनाश्रम महास्वामी यांच्या प्रतिमेचे आगमन उंडील मठातील मान्यवरांच्या हस्ते गगनगिरी सेवाश्रम केळवली येथे झाले. ढोल ताशाच्या गजरात केळवली पंचक्रोशीतील वैश्य बांधवांनी गुरु प्रतिमेचे स्वागत केले. त्यानंतर गुरूंच्या प्रतिमेची स्थापना करून पूजा विधी पार पडल्या. यावेळी पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने वैश्य बांधव उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध मान्यवर वैश्यबांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापूजा संपन्न झाल्यानंतर गुरूंची महाआरती पार पडली. महाआरतीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेल्या विविध मान्यवर वैश्य बांधवांचा पंचक्रोशीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये महेंद्र मुरकर अध्यक्ष वैश्य समाज कणकवली, गणपत वळंजु चेअरमन सिंधुदुर्ग वैश्य समाज बँक, उमेश वाळके संचालक, गणपत पारकर संचालक गुरुनाथ पावसकर सेक्रेटरी ईश्वरदास पावसकर मुख्य कार्यकारी अधिकारी, मोहन मोदी वसुली अधिकारी, महेश पारकर खजिनदार उंडील मठ, बाळा जठार माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, रवींद्र शेट्ये सरपंच शिडवणे, डॉक्टर संजय कोकाटे शिडवणे, चंद्रकांत कानकेकर वारगाव, अशोक कोकाटे साळीस्ते, प्रभाकर ताम्हणकर सरपंच साळीस्ते, विरेंद्र चिके माजी सरपंच खारेपाटण, रमेश नर उंडील आश्रम कमिटी, चंद्रकांत शेट्ये माजी पोलीस पाटील खारेपाटण, सुधीर नकाशे माजी जिल्हा परिषद सदस्य, बाबा कोकाटे, प्रफुल्ल कोकाटे,नाधवडे उज्वला चिके महिला ओबीसी तालुका अध्यक्ष कणकवली भाजपा अशा विविध मान्यवरांचा पंचक्रोशीतील वैश्य बांधवांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
मान्यवरांच्या सन्मानानंतर वैश्य बांधवांनी स्वामींच्या प्रतिमेचे दर्शन घेतले व प्रसाद घेतला. त्यानंतर सर्व वैश्य बांधवांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती महाप्रसाद व त्यानंतर भजनाचा कार्यक्रम पार पडला .या संपूर्ण कार्यक्रमाला सुमारे पाचशे ते सहाशे वैश्य बांधव उपस्थित होते .अशा प्रकारे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. केळवली पंचक्रोशीतील सर्व वैश्य बांधवांनी परमपूज्य गगनगिरी सेवाश्रम समिती यांनी सदर कार्यक्रमासाठी सेवाश्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.













