कोकण विभागातील शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार – प्रमोद रावराणे
वैभववाडी (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालास चांगला भाव मिळवून देण्यासाठी पणन महासंघ काम करतो महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक मंडळाच्या सन 2023 ते 2028 च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 9 मे 2023 रोजी कार्यक्रम जाहीर झाला होता महाराष्ट्रातील 19 संचालकांपैकी कोकण विभागातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे व पालघर पाच जिल्ह्यांसाठी सर्वसाधारण गटात दोन जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. कोकण विभागातील सर्वसाधारण जागेसाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांना महायुतीकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. त्यांची पणन महासंघाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.
कोकण विभागातील पाचही जिल्ह्यातील अटल पणन अभियानांतर्गत उत्पादन ब्रॅण्डिंग व विक्री व्यवसाय वृद्धिंगत करण्यास प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांना जी आय मानांकन मिळालेले आहे अशा एकत्रित पदार्थांना बाजारपेठ मिळवून देणार व एन इ एम एल पोर्टल खरेदी व नोंदणी प्रक्रिया सुरळीत करणे मिश्र खतांच्या निर्मितीस चालना व पशुखाद्य कारखाने सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील त्यांनी सांगितले. पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी नियमित संपर्क साधून त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.













