माळगाव ग्रंथालयाच्या वतीने आयोजन
मसुरे (प्रतिनिधी) : वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या हेतूने माळगाव पंचक्रोशी ज्ञान प्रसारक मंडळ ग्रंथालय माळगाव यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा या शाळेत आज ‘पुस्तक प्रदर्शन व वाचन मेळा’ आयोजित करण्यात आला होता. “विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, वाचनातून आपली प्राचीन परंपरा, विविध संस्कार, विद्यार्थ्यांमध्ये रुजावित यासाठी पुस्तके आपल्या शाळेत हा उपक्रम आम्ही राबविला आहे. वेळोवेळी ग्रंथालयातील पुस्तके तुमच्यापर्यंत पुरविली जातील. सर्व विद्यार्थ्यांनी वाचनाचा व्यासंग करावा,” असे आवाहन माळगाव ग्रंथालयाचे अध्यक्ष अरुण भोगले यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक प्रशांत पारकर, शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, कविता सापळे, ग्रंथालय अध्यक्ष अरुण भोगले, ग्रंथपाल तन्वी राणे उपस्थित होते.
