आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मणिपूर येथील घृणास्पद व अमानवीय कृत्याचा प्राथमिक शिक्षक महिला सेलकडून निषेध

केंद्रीय गृहमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देत केला निषेध व्यक्त ओराेस (प्रतिनिधी) : मणिपूर येथील दोन महिलांना विवस्त्र करून धिंड काढण्यात आलेली आहे. या घृणास्पद व अमानवीय कृत्याचा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या महिलां सेल सिंधुदुर्गच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.…

वैभववाडी -उंबर्डे मार्गालगत सुकलेली व धोकादायक सुरुची झाडे तात्काळ हटवण्याबाबत ग्रामस्थांचे तहसीलदार यांना निवेदन

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास सदर बाब आणून दिलेली असताना देखील विभागाने दुर्लक्ष केल्याची ग्रामस्थांची तक्रार वैभववाडी (प्रतिनिधी ) : वैभववाडी -उंबर्डे रस्त्यावर अनेक सुकलेली व रस्त्याच्या बाजूला झुकलेली झाडे धोकादायक पडण्याच्या स्थितीत आहेत. सदरची झाडे केव्हाही उन्मळून पडतील या स्थितीमध्ये…

ओझर विद्यामंदिर संस्था चालकांनी जाणून घेतली वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय शाळा!

मसुरे प्रतिनिधी) : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, व शिक्षक यांनी पुण्यातील शिरूर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुप्रसिद्ध जिल्हा परिषद वाबळेवाडी, शाळेला नुकतीच भेट देऊन अभ्यास दौरा पूर्ण केला. वाबळेवाडी जिल्हा परिषद…

जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच,दाभोली,वेंगुर्ला चे आयोजन मसुरे(प्रतिनिधी) : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने महिला शाळा व्यवस्थापन समिती आणि माता-पालक समितीवर सदस्य…

कुडाळ व मालवण तालुक्यातील विविध विकासकामसंदर्भात भाजपा नेते निलेश राणे यांनी घेतली ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची भेट

कुडाळ मालवण तालुक्यातील २५/१५ व पर्यटन विषयक विकास कामांसंदर्भातील सकारात्मक चर्चा कुडाळ ( अमोल गोसावी ) : भारतीय जनता पक्षाचे कुडाळ मालवण विधानसभा निवडणुक प्रभारी, तथा माजी खासदार निलेश राणे यांनी आज, कुडाळ मालवण मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात ग्रामविकास तथा…

पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान !

तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांचे प्रतिपादन पोईप येथे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत जनजागृती कार्यशाळा मसुरे (प्रतिनिधी) : पिक विमा योजना आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी वरदान अशी आहे त्यासाठी केवळ सात दिवस शिल्लक असून आपण सर्वांनी या…

टक्केवारीचं झाड लावून खराब रस्त्यांचा आप ने केला निषेध

आम आदमी पार्टीने शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नाकडे वेधले लक्ष कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूरात पावसाळा आला की महापालिकेच्या रस्त्यांचे डांबर पाण्यात विरघळायला लागते. टक्केवारीच्या विळख्यात अडकलेले सुमार दर्जाचे रस्ते अगदी पाचवीलाच पूजलेले आहेत. अगदी वर्षभर आधी केलेल्या रस्त्यांची देखील चाळण…

नेरूर येथे दरड कोसळून वाहतूक ठप्प

घटनास्थळी भाजप नेते रणजीत देसाई यांची पाहणी कुडाळ ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरड कोसळून नुकसान होत आहे. काल अतिवृष्टीमुळे कांडरीवाडी येथील विठोबाची खांद या ठिकाणी…

आचरा हिर्लेवाडी येथील प्रविण (पी. टी) कांबळी यांचे मुंबई येथे निधन…..!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आचरा हिर्लेवाडी येथील रहिवासी प्रविण (पि.टी) तुकाराम कांबळी (रा. मुंबई) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे नुकतेच निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. 1982 ते 1997 या काळात टेनिस बाँल क्रिकेट मध्ये जिल्हातील नामवंत क्रिकेट खेळाडूत…

अखेर कुडाळ-मालवण मार्गावरील ‘त्या’ पुलाची डागडुजी

शिवसेनेचे ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ नेरुरपारमार्गे मालवण या मुख्य रस्त्यावरील नेरुर जकात नाका ते नागदा मारुती मंदिरदरम्यान नेरुर कलमेवाडी येथे असलेल्या ओढ्यावरील पुलाचा काही भाग शुक्रवारी रात्री अतिवृष्टीमुळे ढासळला होता. यामुळे कुडाळ-मालवण…

error: Content is protected !!