रामेश्वर विद्यालय तळगाव येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेंतर्गत तृणधान्य पाककला संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : तळगाव हितवर्धक संघ मुंबई, संचालित श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय, तळगाव.येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना अंतर्गत तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या पाककला स्पर्धेमध्ये एकूण पंधरा स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद दिला.

सहभागी स्पर्धकांनी तृणधान्याच्या पौष्टिक पाककृती तयार करून स्पर्धेमध्ये परीक्षणासाठी ठेवल्या होत्या त्यापैकी प्रथम तीन आणि उत्तेजनार्थ एक असे एकूण चार स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
प्रथम क्रमांक:
भारती दळवी -हातणकर.वरीची खीर

द्वितीय क्रमांक : मयुरी मुरारी टेमकरनाचणीच्या सत्वाच्या वडया

तॄतीय क्रमांक : रक्षिता सहदेव दळवी -मिक्स पीठाचा डोसा

उत्तेजनार्थ बक्षीस : पूजा संजय राऊळ -नाचणीचे लाडू

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री.परब कॄषी अधिकारी,मालवण व सौ.भोगले मॅडम कॄषी सहायक सुकळवाड यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमासाठी स्पर्धकांसोबतच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक महिला, अंगणवाडी सेविका, आशाताई यांनी देखील आपली उपस्थिती दर्शविली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून स्पर्धेच्या परीक्षकांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित पालक, ग्रामस्थ आणि स्पर्धक यांना तृणधान्याचे आहारातील महत्व या संबंधीची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभा प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैलजा शिरोडकर यांनी सर्व स्पर्धकांचे, विजेत्यांचे, परीक्षकांचे,उपस्थित मान्यवरांचे तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशाताई या सर्वांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जैतापकर सर यांनी केले

error: Content is protected !!