खारेपाटण शहरातील सुरक्षा रामभरोसे ; ग्रामपंचायतचे कुठल्याही प्रकारचे नियोजन नाही

ग्राम सुरक्षा दल फक्त कागदावर ; सी सी टि व्ही कॅमेरे वाढविण्याची मागणी

खारेपाटण (प्रतिनिधी) : बुधवारी खारेपाटण येथे भरदिवसा दुपारी रहदारीच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या चोरीच्या घटनेतील सर्वच्या सर्व चौघेही आरोपी गुन्हा करून पळून गेल्याने खळबळ माजली असून यामुळे खारेपाटण शहरामधील मधील सुरक्षा ही सद्या रामभरोसे असल्याचे जाणकार नागरिकांकडून बोलले जात आहे.

सद्या अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गौरी गणपतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या संख्येने गावी यायला सुरवात झाली असून यामुळे खारेपाटण बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढणार आहे. अशावेळी चोरी सारख्या घटना दिवसा ढवळ्या खारेपाटण शहरात घडणे म्हणजेच येथील सुरक्षितते बाबत जेवढी पोलिसांची जबवादरी आहे.तेवढीच कैक पटीने येथील नागरिकांची देखील आहे.मात्र चोरी सारख्या घटना घडल्यावरच आम्ही सर्व जागे होतो.

खारेपाटण येथे दोन राष्ट्रीय बँका एक जिल्हा बँक तर तीन सहकारी पतसंस्था कार्यरत असून सर्व बँकांनी आपल्या कॅश काऊंटर आणि कार्यालयात सी सी टी कॅमेरे लावलेले आहेतच.पण बँकांच्या समोरील प्रवेशद्वार व त्यासमोरील पार्किंग व रस्ता कव्हर करेल असे देखील सि सी टी कॅमेरे दर्शनी भागी बसविणे गरजेचे आहेत. तसेच खारेपाटण बाजारपेठेत देखील बहुतांशी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात सी सी टी वी कॅमेरे बसविले आहेत. मात्र प्रत्येकाने एक कॅमेरा दुकांनाच्या बाहेरील बाजू रस्ता कव्हर करेल असा बसविणे गरजेचा आहे. तसेच गौरी गणपतीचा सण तोंडावर आला तरी अजूनही खारेपाटण ग्रामपंचायतीचे वाहतूकी बाबत स्थानिक व्यापारी व बाहेरून येणाऱ्या व्यापारी वर्ग याबाबत तसेच रिक्षा व खजगी वाहने चालक मालक नियोजन बैठक झालेले दिसत नाही किंवा तशा प्रकारचे सूचना फलक लावलेले नसल्याने खाजगी वाहने अवास्तव रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेली दिसत आहेत. व्यापारी वर्गाने गर्दीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व पोलिसांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. गावात ग्राम सुरक्षा दल आहे.ते पण फक्त कागदावर असल्यासारखेच यानिमित्ताने दिसून आले आहे. तसेच जिल्हा पोलिस प्रशासन यंत्रणेकडून सुद्धा खारेपाटण शहरात तथा बाजारपेठेत तसेच मुबई – गोवा महामार्गावर बसविण्यात आलेले सद्य स्थितीतील सी सी टी वी कॅमेरे हे फक्त चार ठीकणीच असून सुमारे ६००० लोकसंख्या असलेल्या खारेपाटण शहराच्या दृष्टीने ते अपूर्ण आहेत. तरी त्यांची संख्या आणखी वाढविणे गरजेचे आहे. व बंद असलेले सी सी कॅमेरे तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहेत.अशी मागणी खारेपाटण नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कारण खारेपाटण मध्ये झालेल्या चोरीतील चोरटे हे बँकेच्या सी सी टि व्ही कॅमेरा फुटेज मध्ये जरी आढळून आले असले तरी त्यांच्या पळून जाण्याची दिशा किंवा मार्ग आढळून येत नाही.जर गावात सि सी टिव्ही कॅमेरे यांची संख्या आणखी वाढविली गेली असती तर संपूर्ण शहर व मुंबई गोवा महामार्ग त्यामध्ये कव्हर झाला असता. व परिणामी चोरी करणारे चोरटे आपल्याला जलद गतीने पकडायला मदत झाली असती. तरी नागरिकांनी विशेष करून महिलांनी व ज्येष्ठ नागरिक काळजी घेणे आवश्यक असून गर्दीच्या ठीकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद व अनोळखी कुणीही व्यक्ती आढळून आल्यास लगेच पोलिसाशी संपर्क साधावा असे आवाहन कणकवली तालुका पोलिस उपनिरीक्षक शरद देठे यांनी नागरिकांना केले आहे.

error: Content is protected !!