श्री शिवकृपा युवा मंडळ आचरा पारवाडी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..!

आचरा (प्रतिनिधी) : शिवकृपा युवा मंडळ आचरा पारवाडीच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर आज गुरुवार 14 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 ते 4 यावेळेत आचरा तिठा येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला पंचक्रोशीतील सुमारे 90 पेक्षा जास्त जनांनी लाभ घेतला.

विवेकानंद नेत्रालय कणकवली येथील डॉ. संदीप कदम व त्यांचे सहकारी तुषार हळवे यांचा उद्योजक जयप्रकाश (बाबु) परुळेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करुन शिबिरास सुरुवात करण्यात आली

यावेळी अध्यक्ष मिलिंद अशोक मुळये, उपाध्यक्ष सचिन परब, सचिव केदार शिर्के, खजिनदार हरेश शेटये तसेच सांस्कृतिक समितीचे प्रमुख मुकेश मधुकर सावंत आणि नितिन घाडी तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मंडळाच्या वतीने उपस्थितांचे व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!