खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या प्रशालेच्या एन सी सी विभागातील कॅडेट कु. आर्या मोसमकर व कु.पुनम चांदीलकर या दोन विद्यार्थिनीची कला व संगीत या सांस्कृतिक प्रकारात नुकतीच कोल्हापूर येथे होणाऱ्या प्रि आर डी सी कॅम्पसाठी निवड झाली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व सचिव महेश कोळसुलकर तसेच सर्व संचालक मंडळ सदस्यांनी या विद्यार्थ्यांनीचे विशेष कौतुक केले असून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतेच या दोन्ही विद्यार्थिनीचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक संजय सानप यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक संतोष राऊत सर उपस्थित होते. दिल्ली येथे होणाऱ्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलन कार्यक्रम पूर्वतयारी करीता एन सी सी कॅडेट मधून बेस्ट कॅडेट ची निवड करून अशा विद्यार्थ्याना मुख्य ध्वज संचलन कार्यक्रमाला पाठविले जाते. याच्या पूर्व तयारी करीता ५८ महाराष्ट्र बटालियन एन सी सी सिंधुदुर्ग यांची निवड प्रकिया सिंधुदुर्ग ओरोस येथे पार पडली.यामध्ये खारेपाटण हायस्कूलच्या या दोन विद्यार्थीनीची कोल्हापूर एन सी सी ग्रुप हेडक्वार्टर येथे होणाऱ्या प्रि आर डी सी कॅम्प करीता निवड झाली असून खारेपाटण हायस्कूलचे एन सी सी ऑफिसर राम कापसे सर यांचे या विद्यार्थ्याना विशेष मार्गदर्शन लाभले.
खारेपाटण हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनीची कोल्हापूर येथील प्री आर डी सी कॅम्पसाठी निवड












