कणकवली (प्रतिनिधी) : असलदे येथील निर्मला प्रकाश परब (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे उपचार दरम्यान बुधवारी दुपारी १२.३० वाजता निधन झाले.त्यांच्या मृतदेहावर आज असलदे येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
काही दिवसापासून निर्मला परब या आजारी होत्या.त्यांच्यावर मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली होती.काल उपचारादरम्यान अचानक प्रकृती खालवल्याने त्यांचे निधन झाले.सोसायटी माजी चेअरमन प्रकाश परब यांच्या त्या पत्नी होत.त्यांच्या पश्चात पती,मुलगा,३ मुली, जावई,नातवडे,सून असा परिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.












