प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नियुक्ती
कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे चिरंजीव प्रथमेश तेली यांची भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रथमेश तेली यांच्या नियुक्ती ची घोषणा केली असून प्रथमेश याना नियुक्ती पत्र दिले आहे. माजी आमदार असलेले राजन तेली यांचा राजकीय वारसा त्यांच्या दोन सुपुत्रांपैकी कोण चालवणार ? याचे उत्तर आता मिळाले असून प्रथमेश तेली हे आता थेट भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून राजकारणात सक्रिय झाले आहेत.












