आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कुडाळात बॅंक युनियनची निदर्शने

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय बॅंकांमध्ये नोकर भरती करणे, पाच दिवसांचा आठवडा करणे यासह अन्य मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्यावतीने कुडाळ येथे निदर्शने केली. युनियनचे पदाधिकारी निखिल साटम, राजरूप केळुस्कर, हृषिकेश गावडे यांच्यासह बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन…

शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुक्यातर्फे शिवजयंतीदिनी महारॅली

दुचाकी – चारचाकी रॅलीचे आयोजन विविध सामाजिक उपक्रमही होणार शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : युवा नेते प्रताप भोसले यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे दुचाकी, चारचाकी महारॅलीचे आयोजन…

विजेच्या बल्ब मध्ये साकारले छत्रपती शिवरायांचे चित्र

कलाशिक्षक समीर चांदरकर यांची आणखी एक अफलातून कलाकृती चौके (प्रतिनिधी) : शिवजयंतीचे औचित्य साधून वराडकर हायस्कूल कट्टाचे कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी विजेच्या बल्ब मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारले. साडेतीनशे वर्षाच्या पारतंत्र्याच्या अंध:कारात खितपत पडलेल्या रयतेला गुलामगिरीच्या चोखडातून मुक्त…

“मी लाभार्थी सारथी योजना एक सुवर्णसंधी” – सरपंच शेखर पेणकर

चौके (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे सारथीच्यावतीने युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना सहा महिन्याचे मोफत संगणकीय प्रशिक्षण दिले जात असून मालवण तालुक्यातील…

घरेलू महिला कामगार स्मार्ट कार्डचे वाटप

मालवण (प्रतिनिधी) : वायरी भूतनाथ उपसरपंच प्राची मांणगावकर यांनी महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळ यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा कामगार मंडळ यांच्याकडे वायरी भुथनाथ गावातील घरेलू महिला कामगार यांची कामगार मंडळ सिंधुदुर्ग यांच्याकडे नोंदणी करत त्यांना स्मार्ट कार्डचे वाटप केले. यावेळी देवानंद…

सुलेखा सुरेश राणे यांचे हृदयविकाराने निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील मधलीवाडी येथील सुलेखा सुरेश राणे (वय 65) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर कणकवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे. जिल्हा परिषद शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक सुरेश राणे यांच्या…

1 लाखाच्याअवैध दारूसह 4 लाखाचा मुद्देमाल जप्त

एक्साईज इन्सुली चेकपोस्ट ची कारवाई सावंतवाडी (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग पथकाने तेरेखोल नदी पुलावर आरोसबाग येथे अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह अंदाजे. 4,14,240/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मनोज शेवरे,…

भुईबावडा घाटात ट्रक आणि कार चा अपघात ; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : खारेपाटण गगनबावडा राज्य मार्गावर भुईबावडा घाटात ट्रक आणि चार चाकी यांच्यात टक्कर होऊन अपघात झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. गगनबावडा वरून वैभववाडी कडे ऊस वाहून नेण्यासाठी ट्रक येत होता…

माजी सभापती कै. कांताप्पा शेट्ये यांच्या कुटुंबियांचे जठार यांनी केले सांत्वन

कणकवली (प्रतिनिधी) : माजी सभापती तथा खारेपाटण गावचे ज्येष्ठ नागरिक पितृतुल्य व्यक्तिमत्व कै. कांताप्पा शेट्ये यांचे वृद्धापकाळाने अलीकडेच निधन झाले त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत माजी आमदार प्रमोद जठार यांनी त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी त्यांच्या तीन विवाहित मुली, पुतण्या ,पत्नी यांना…

राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत मंगेश मुद्रस व चालिंदर कदम यांच्या बैलजोडीचा प्रथम क्रमांक

नाधवडे येथे बंड्या मांजरेकर मित्र मंडळ च्या वतीने स्पर्धेचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : बंड्या मांजरेकर मित्र मंडळ आयोजित राज्यस्तरीय भव्य बैलगाडा शर्यत नाधवडे येथील महादेव मंदिर मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत राज्यस्तरीय गटात मंगेश मुद्रस उंबर्डे यांच्या बैलजोडीने…

error: Content is protected !!