सुलेखा सुरेश राणे यांचे हृदयविकाराने निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील मधलीवाडी येथील सुलेखा सुरेश राणे (वय 65) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर कणकवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे. जिल्हा परिषद शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक सुरेश राणे यांच्या त्या पत्नी तर युनिक चिकन सेंटरचे अवधूत राणे यांच्या त्या मातोश्री होत.

error: Content is protected !!