कणकवली (प्रतिनिधी) : माजी सभापती तथा खारेपाटण गावचे ज्येष्ठ नागरिक पितृतुल्य व्यक्तिमत्व कै. कांताप्पा शेट्ये यांचे वृद्धापकाळाने अलीकडेच निधन झाले त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत माजी आमदार प्रमोद जठार यांनी त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी त्यांच्या तीन विवाहित मुली, पुतण्या ,पत्नी यांना धीर दिला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शिडवणे गावचे सरपंच रवींद्र शेटे,राजू वरुनकर, चंद्रकांत हरयाण भाऊ राणे, सुधीर कुबल, देवस्थळी इत्यादी उपस्थित होते
माजी सभापती कै. कांताप्पा शेट्ये यांच्या कुटुंबियांचे जठार यांनी केले सांत्वन











