1 लाखाच्याअवैध दारूसह 4 लाखाचा मुद्देमाल जप्त

एक्साईज इन्सुली चेकपोस्ट ची कारवाई

सावंतवाडी (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग पथकाने तेरेखोल नदी पुलावर आरोसबाग येथे अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह अंदाजे. 4,14,240/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मनोज शेवरे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार तेरेखोल नदी पुलावर आरोसबाग, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे दि.16 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे अवैध मद्य वाहतुकीच्या संशयीत वाहनांची तपासणी करीत असताना मारुती इको चारचाकी वाहन क्र.MH-07-Q-3317 या चारचाकी वाहनाच्या पाठीमागील हौद्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध बॅन्डचे 24 बॉक्स (1104 बाटल्या) अवैध मद्यसाठा मिळून आला. सदर प्रकरणी वाहन चालक गणेश लक्ष्मण चव्हाण (वय 35 वर्षे, रा. सबनीसवाडा, सावंतवाडी) व सिसिल जॉन फेराव (55 वर्षे, रा. सबनीसवाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यामध्ये अं.रु.1,14,240/- किंमतीचे मद्य व रु.3,00,000/- किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण अं.रु.4,14,240/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर कारवाई भानुदास खडके, निरीक्षक, प्रदीप रास्कर, दुय्यम निरीक्षक,धंनजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक, विवेक कदम, दुय्यम निरीक्षक, रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक, दिपक वायदंडे, जवान, सतिश चौगुले, जवान,सागर सुर्यवंशी, जवान, अभिषेक खत्री, जवान यांनी केली. सदर प्रकरणी पुढील तपास धंनजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक तपासणी नाका इन्सुली हे करीत आहेत.

error: Content is protected !!