मोदी@९अभियान अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात बांदा मंडलात “जेष्ठ कार्यकर्ता संमेलन संपन्न

आचरा (प्रतिनिधी): मोदी@९ अभियांना अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बांदा मंडलात जेष्ठ कार्यकर्ता संमेलन कार्यक्रम भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बांदा येथील आनंदी मंगल कार्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक व प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस व अभियानाचे विधानसभा संयोजक प्रसन्ना(बाळू) देसाई, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, माजी जि. प सदस्य प्रमोद कामत, माजी जिल्हाध्यक्ष शाम काणेकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, बांदा सरपंच श्रीमती प्रियंका नाईक, माजी बांदा सरपंच अशोक सावंत, बांदा शहर अध्यक्ष नरसिंह उर्फ बाबा काणेकर, तसेच सावंतवाडी विधानसभेतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दादू कविटकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सावंतवाडी विधानसभेतील 250 जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. मागील 9 वर्षांतील मोदी सरकारच्या जनहिताच्या योजना तळागाळात पोचवण्याबरोबरच शेवटच्या व्यक्तीपर्यंत कशा पोहोचतील. यासंबंधी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अतुल काळसेकर यांचा सत्कार करण्यात आला, तसेच उपस्थितांपैकी सर्वात जेष्ठ महीला व पुरुष कार्यकर्त्यांचा सत्कार अतुलजी काळसेकर यांच्या हस्ते करण्यात आला..

error: Content is protected !!