खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने ४५० महिलाना शेतकरी प्रमाणपत्र वाटप

जि.प.सदस्य प्राची ईसवलकर, पं.स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व ग्रामपंचायत खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार दि.२५ नोव्हेंबर २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण येथे गावातील सुमारे ४५० महिलाना महिला शेतकरी प्रमाणपत्राचे वितरण जि.प. सदस्य प्राची ईसवलकर व पं.स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात आले.

खारेपाटण गावचे सरपंच श्री महेंद्र गुरव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या ग्रामसभेत येथील शेतकरी महिलाना शेतकरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला माजी सरपंच रमाकांत राऊत,ग्रा.पं.सदस्य सुधाकर ढेकणे,जयदीप देसाई, किरण कर्ले,सौ मनाली होणाळे, क्षितिजा धुमाळे,दक्षता सुतार, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुहास राऊत,सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडे, कृषी अधिकारी श्री सागर चव्हाण आदी मान्यवर पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी खारेपाटण गावच्या माजी सरपंच तसेच जि.प.सदस्या प्राची ईसवलकर यांचा २५ नोव्हेंबर हा वाढदिवस ग्रामपंचायत खारेपाटण व ग्रामस्थांच्या वतीने आनंदाने साजरा करण्यात आला.व त्यांना त्यांच्या उदंड आयुष्यासाठी भविष्यातील राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!