बालदिनानिमित्त दिविजा वृद्धाश्रमातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : बालदिनाचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष संदेश शेट्ये ह्यांनी दिविजा वृद्धाश्रमातर्फे प्राथमिक शाळा कोळोशी हडपिड, माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपिड, प्राथमिक शाळा कोळोशी खालचीवाडी, प्राथमिक शाळा कोळोशी वरची वाडी, प्राथमिक शाळा राकसवाडी, प्राथमिक शाळा असलदे गावठणवाडी, कोळोशी अंगणवाडी व असलदे अंगणवाडी या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेचे कासार्डे ब्राह्मणवाडी शाळेला तुटलेली फरशी नवीन बसवण्यासाठी मदत केली.

या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या,कंपास,पट्टी,अंकलपेटी तसेच इतर शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

दिविजा वृद्धाश्रमाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सर्व शाळांमध्ये जाऊन साहित्य वाटप केले. विद्यार्थ्यांनी आनंदाने साहित्य स्वीकारले व आयोजकांचे आभार मानले.

राकसवाडी शाळेतील मुलांना किट वाटप केले.

जयंद्र चव्हाण शाळेतील मुलांना किट वाटप केले.

कोलोशी वरची वाडी किट वाटप केले.

प्राथमिक शाळा कोलोशी हडपिड किट वाटप केले.

error: Content is protected !!