फोंडाघाट (प्रतिनिधी) : आज २६ नोव्हेंबर संविधान दिवसाचे अवचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल,फोंडाघाट च्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी ” संविधान जनजागृती रॅली ” काढली. याच दिवशी सन १९४९ रोजी संविधान सभेने, भारतीय संविधानाचा स्वीकार केला. आणि २६ जानेवारी १९५० पासून ते अमलात आणले. यावेळी मुला-मुलींच्या संविधान विषयक बुलंद घोषणांनी फोंडा बाजारपेठ दुमदुमली. संविधानिक मूल्यांची आणि मूलभूत अधिकार व कर्तव्याची जाणीव, या रॅलीमुळे फोंडाघाट परिसरात अधोरेखित झाली. या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
फोंडाघाट हायस्कूलच्या संविधान रॅलीमुळे संविधानाचे महत्त्व अधोरेखित !











