नेरूर चौपाटी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी उत्सव

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील नेरूर चौपाटी या ठिकाणी असलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात काल सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. रात्री दहा वाजता कलेश्वर महाराजांची पालखी ढोल ताशांच्या गजरात मध्ये विठ्ठल रखुमाई मंदिरात चौपाटी या ठिकाणी आली. आज सकाळी मंदिरात धार्मिक संपन्न झाले. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. सकाळी ११ वाजता ह. भ. प. श्री. उपाध्ये यांचे कीर्तन सादर झाले. त्यानंतर श्रींची पालखी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात आणि हरिनामाच्या गजरात श्री. देव कलेश्वर मंदिराकडे रवाना झाली.

error: Content is protected !!