आचरा (प्रतिनिधी): आज पंढरपूर यात्रा म्हणजे आषाढी एकादशी हिंदूचा पवित्र सण, याचे औचित्य साधत आचरा पोलिस ठाणे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी आचरा रामेश्वर मंदिर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेत हिंदू बांधवाना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. त्याच प्रमाणे आज मुस्लिम बांधवांचाही ईद-अल-अजहा म्हणजे बकरी ईद हा सण आहे या निमित्त श्री व्हटकर यांनी आचरा काझीवाडा येथील मशिदीत जाऊन मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून आचरा पोलिस ठाणे हद्दीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आचरा पोलिस स्टेशनचे प्रभारी स. पो. नि-अनिल व्हटकर यांनी आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त हिंदू, मुस्लिम बांधवाना शुभेच्छा…!












