खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व प्लस टू स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये बुधवार दिनांक 28 जून रोजी इयत्ता अकरावी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा नुकताच संपन्न झाला. खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमध्ये आर्ट्स, कॉमर्स व सायन्स तसेच प्लस टू स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम यामध्ये ऑटो इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी, ऑडिटिंग व ऑफिस मॅनेजमेंट हे तीन व्यवसाय प्रशिक्षणाचे वर्ग चालवले जातात. या प्रशालेमध्ये खारेपाटण परिसरातील तसेच देवगड, राजापूर, वैभववाडी व कणकवली तालुक्यातील जवळजवळ 30 गावातील विद्यार्थी ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. बुधवार दिनांक 28 जून रोजी शासकीय आदेशाप्रमाणे इयत्ता अकरावीचे वर्ग सुरू करण्यात आले, त्यावेळी इयत्ता अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रवेशोत्सव सोहळ्याला प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक अजय गुरसाळे तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय सानप यांनी करिअर गाईडन्स व विद्यार्थ्यांचे सामाजिकीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना ध्येय निश्चितीसाठी मार्गदर्शन केले. तसेच सर्व शिक्षकांनी इयत्ता अकरावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक श्री.सचिन शेट्ये यांनी केले.
शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटणमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशोत्सव सोहळा संपन्न












