मसुरे देऊळवाडा शाळेत आरोग्य विषयक मार्गदर्शन व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

मसुरे (प्रतिनिधी): प्राथमिक आरोग्य केंद्र, मसुरे व शाळा व्यवस्थापन समिती देऊळवाडाच्या सहकार्याने प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा शाळेत आरोग्य विषयक मार्गदर्शन व विद्यार्थी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी डाॅ. वीणा मेहेंदळे, आरोग्यसेवक सावजी, रसाळ मॅडम, आशा स्वयंसेवका अंकिता मेस्त्री, प्रयोगशाळा तंत्रज्ञ कदम यांनी आरोग्य केंद्राच्या वतीने सहकार्य केले. यावेळी ‘पावसाळ्यात घ्यावयाची आरोग्याची काळजी’ या विषयावर डॉ. मेहेंदळे मॅडम यांनी मार्गदर्शन केले तर आरोग्यसेवक सावजी यांनी पावसाळ्यात पसरणारे साथीचे रोग याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्व मुलांचा रक्तगट आणि हिमोग्लोबिन तपासण्यात आले. त्याबाबत मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदानंद कबरे, उपाध्यक्ष लाकम, मुख्याध्यापक प्रशांत पारकर व शिक्षक वर्ग यांनी नियोजन केले.

error: Content is protected !!