हरकूळखुर्द (प्रतिनिधी) : येथील श्री माता कालिका देवी सेवा मंडळ, हरकूळखुर्द यांच्या वतीने विद्यामंदिर हरकूळखुर्द प्रशालेला दोन ग्रीन बोर्ड सप्रेम भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या वेळी अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सेवा मंडळाने हा स्तुत्य उपक्रम राबविला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष आशुतोष अंकुश रासम होते. यावेळी किशोर अनंत यादव, मुख्याध्यापक- संतोष बापूराव कदम, (शालेय समिती सभासद) अनिल रघुनाथ सावंत, (शालेय समिती सभासद) विजय कृष्णा हुले, (अध्यक्ष श्री. माता कालिका देवी सेवा मंडळ) अजय आनंद हुले, (सचिव श्री. माता कालिका देवी सेवा मंडळ) पंढरीनाथ रामचंद्र केरकर, (खजिनदार श्री. माता कालिका देवी सेवा मंडळ) जयप्रकाश तुकाराम हुले, ( श्री माता कालिका देवी सेवा मंडळ सभासद) तसेच नामदेव दत्ताराम हुले (श्री माता कालिका देवी सेवा मंडळ सभासद )शिक्षक विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेला दोन ग्रीन बोर्ड उपलब्ध झाल्यामुळे शिक्षकांना अध्यापन करताना अधिक सुलभता होणार असून विद्यार्थ्यांना त्याचा शैक्षणिक लाभ मिळणार आहे. शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी श्री कालिका देवी सेवा मंडळाने केलेले हे योगदान निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.
यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी दोन ग्रीन बोर्ड सप्रेम भेट दिल्याबद्दल विद्यामंदिर हरकूळखुर्द प्रशालेच्या वतीने श्री कालिका देवी सेवा मंडळाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. मंडळाच्या या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचे परिसरातून कौतुक होत आहे.












