आचरा (प्रतिनिधी): ह्युमन राईटस् असोशिएशन फाँर प्रोटेक्शन मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी व तालुका निरीक्षक संदेश फाटक यांनी काल मालवण नगर परिषद मुख्याधिकारी यांची भेट घेत, डॉ. दिघे यांचे घरापासून मुस्लिम मोहल्ला मार्गे हॉटेल महाराजा पर्यंतचा नविन रस्त्यापर्यंत गेली तीन वर्षे गटारामधील गाळ काढ न काढल्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यालगतच्या घरामध्ये गटाराचे पाणी जात आहे. लवकरात लवकर सदर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गटारांची साफसफाई करा अशी मागणी निवेदन व्दारे केली.
ह्युमन राईटस् कडून मालवण मुख्याधिकार्याना निवेदन












