सातार्डे चेकपोस्टवर आरोपी अर्जुन रामा पाटील घेतले ताब्यात
सावंतवाडी (प्रतिनिधी) : गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना कोल्हापुरातील एकाला सातार्डा येथील चेक पोस्टवर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून कारसह तब्बल १ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अर्जुन रामा पाटील (रा. हातकणंगले – कोल्हापूर), असे संशयीताचे नाव आहे. ही कारवाई आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात संशयीता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित हा गोव्याच्या दिशेहून महाराष्ट्र अधिक प्रवेश करत होता. यावेळी सातार्डा चेक पोस्टवर त्यांच्या कारची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. यावेळी त्यात ३४ हजार ८०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आढळून आली. त्यानुसार त्यांच्यावर अवैध दारू वाहतुकीचा गुन्हा दाखल करत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात वॅग्नर कारसह एकूण १ लाख ५४ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस नरेश कुडतरकर व गुरुदास नाईक यांनी केली.