युवासेनेची कणकवली पोलीस ठाण्यावर धडक
कणकवली (प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारत शिवसेना खा.संजय राऊत याना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल भाजपा प्रदेश सचिव तथा माजी खा. निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह शिवसैनिकांनी कणकवली पोलीस ठाण्याला धडक दिली. निलेश राणेंवर गुन्हा दाखल न केल्यास युवासेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी हर्षद गावडे, अनुप वारंग, तेजस राणे, भाई साटम, गुरू पेडणेकर, इमाम नावलेकर, संदीप गावकर, अबू मेस्त्री, प्रतीक रासम, तात्या निकम, निलेश परब आदी उपस्थित होते.