कणकवली (प्रतिनिधी) : अखिल गुरव समाज संघटना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुखपदी अंकुश गुरव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सायली संतोष गुरव यांच्या शिफाफशीनुसार ही निवड करण्यात आली आहे.अंकुश गुरव हे मूळचे सोनवडे ( घोटगे ) गावचे रहिवासी असून अभ्युदयनगर काळाचौकी येथे स्थित आहेत. सोनवडे ग्रामविकास मंडळाचे मागील 7 वर्षे ते अध्यक्ष असून या मंडळामार्फत मागील 35 वर्षे विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम मुंबई सह गावीसुद्धा राबवले जातात.मुंबईत खाजगी शिपिंग कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत असलेले अंकुश गुरव हे नेहमीच ज्ञातीबांधवांसाठी सहकार्याला पुढे असतात. अभ्युदयनगर काळाचौकी शिवसेना शाखा क्र.205 चे उपशाखाप्रमुख असलेल्या अंकुश गुरव यांचा मुंबईसह मूळ गाव सोनवडे घोटगे येथे नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असतात. त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.