शिरवल ग्रामपंचायत येथे २१ जानेवारी रोजी मार्गदर्शन शिबिर होणार
शिबिराचा लाभ घ्यावा,उद्योजक श्री.शंकर पार्सेकर यांचे आवाहन
कणकवली (प्रतिनिधी) : खादी आणि ग्रामउद्योग आयोग सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय भारत सरकार सौजन्य: गजानन नाईक बहुउद्देशीय केंद्र आगर रोड, डहाणू व्यावसायिक प्रशिक्षण सहयोगी लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडेरेशन (रजि.) स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण जागरूकता शिबिर २१ जानेवारीला दुपारी ३.०० वाजता शिरवल ग्रामपंचायत येथे आयोजन करण्यात आले आहे.स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण जागरूकता शिबिराचे आयोजन उद्योजक श्री. शंकर पार्सेकर यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
तरी शिरवल गावातील युवा वर्ग, महिला, बेरोजगारांनी, या शिबिरामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे.आणि लाभ घ्यावा असे आवाहन उद्योजक शंकर पार्सेकर यांनी केले आहे.
▪️उत्पादन क्षेत्रासाठी ५० लाख आणि सेवा क्षेत्रासाठी २० लाखांपर्यंत कर्ज सुविधा,
▪️कर्ज सुविधांवर ३५% पर्यंत अनुदान,
▪️पात्रता १८ वर्ष पेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती / सोसायटी नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत सहकारी संस्था / एनजीओ इत्यादी.
अधिक माहितीसाठी
संपर्क : सरपंच, सौ. गौरी वंजारे – ९७६५२२१८९२,
उपसरपंच, श्री. प्रवीण तांबे- ९४२२८१२२४१ यांच्याशी संपर्क साधावा.