परिसर स्वच्छतेचे नियमित कार्य करून आपले सामाजिक दायित्व पुर्ण करूया – संदिप परब

कार्व्हर डे नाईट शेल्टरकडून वाकोला स्काय ब्रीजवर स्वच्छता मोहिम

जीवन आनंद संस्थेच्या सर्व आश्रमांमधे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्स्फुर्ततेत साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजातील निराधार वंचितांना माणूसकीचे सन्मानजन्य जीवन मिळण्यासाठी जीवन आनंद संस्था गेल्या १० वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेचे रस्त्यांवरील निराधार वंचितांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेले आश्रम आणि शेल्टर होम हे जनतेच्या पाठिंब्यावरच चालतात.आणि म्हणून आश्रमातील सक्षम बांधव आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाने परिसर स्वच्छतेच्या मोहिमा ठिकठिकाणी सातत्याने घेणे हे आपले कर्तव्य आणि सामाजिक दायित्व आहे. अशी भावना जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सचिव संदिप परब यांनी व्यक्त केली.

संस्थेच्या ठिकठिकाणच्या आश्रमांच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमांच्या आयोजनासाठी संदिप परब हे नेहमी आग्रही असतात. याच भुमिकेतून संस्थेच्या मुंबई विभागातील कार्यकर्त्यांनी आणि संस्थेच्या सांताक्रुज येथील कार्व्हर डे नाईट शेल्टरमधील बांधवांच्या सहभागाने ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला वाकोला ब्रीज आणि सबवे मधे नुकतीच स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.दरम्यान जीवन आनंद संस्थेच्या मुंबई विभागातील  समर्थ आश्रम-विरारफाटा, जिल्हा सिंधुदुर्ग मधील  संविता आश्रम- मु.पणदूर ता.कुडाळ व गोव्यातील मां आसोरेघर मु.ओपा खांडेपार,फोंडा व म्हापसे येथील संवेदना आश्रमात ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम उत्स्फुर्तपणे संपन्न झाले.

    समर्थ आश्रमातील ध्वजारोहन प्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष नरेश चव्हाण यांनी ," आपण सर्व भारतीय बांधव आहोत असे प्रतिज्ञेत म्हणतो. आपण नागरिक, प्रत्येक जण जसे आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या समाजातील निराधार वंचितांची काळजी घेणे हे आपले महत्वाचे कर्तव्य आहे. आज रस्त्यांवर असलेले निराधार आणि वंचित बांधव हे समाजाचा आविभाज्य भाग आहेत.ते सर्व विविध कारणांनी आज वंचिततेचे जीवन जगत आहेत.असे त्यांनी यावेळी म्हटले.समर्थ आश्रमातील कार्यक्रम प्रसंगी आश्रमातील बांधव रघुनाथकाका यांनी देशभक्तीपर गीत म्हटले.  ध्वजारोहन कार्यक्रम प्रसंगी भोयेपाडा जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांसह संस्थेचे विश्वस्त किसन चौरे ,उज्वला जाधव, सचिन पडते, अपेक्षा पाटील, सुनिता भंडारी, संपदा सुर्वे, शिवानी शेंगाळे, रत्ना लांघी, चंदा छेत्री , भाईदास माळी, दिपक अडसुळे, दिपाली मेघा-माळी , हसिना खान, वैशाली ताई, राजा यादव आश्रमातील बांधव कार्यक्रमात सहभागी झाले.विश्वस्त किसन चौरे व हसिना खान यांनी मनोगत मांडले. वैशाली काकड यांनी सूत्रसंचलन तर उज्वला जाधव यांनी आभारप्रदर्शन केले.
   
पणदूर येथील संविता आश्रमात संस्थेचे हितचिंतक कौसरभाई खान यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यांनी कार्यक्रमप्रसंगी थोडक्यात मनोगत व्यक्त केले.यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव संदिप परब, सौ.भक्ती परब,विश्वस्त जितेंद्र परब, हितचिंतक आदम मुजावर आश्रमचे सर्व कार्यकर्ते व बांधव उपस्थीत होते.आश्रमच्या कार्यकर्त्यांनी देशभक्तीपर गीत सादर केली. जनसंपर्क प्रमुख महाबळेश्वर कामत यांनी सूत्रसंचलन केले. तर संदिप परब यांनी आभारप्रदर्शन केले. म्हापसा-गोवा येथील संवेदना आश्रमात संस्थेचे हितचिंतक महेश स्वार सर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गणेश विद्यामंदिरचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थीत होते.तर माँ आसरोघर येथे संस्थेचे हितचिंतक डॉ.अजित प्रभू म्हापणे  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळेस डॉ.संगीता म्हापणे व स्वप्निल राणे उपस्थित होते.
error: Content is protected !!