ठेकेदार निखिल कन्स्ट्रक्शन ची तत्परता….तात्काळ दरड हटविण्याचे काम सुरू
कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट रस्त्यात आज रात्री साडेआठच्या सुमारास दरड कोसळल्यामुळे दुतर्फा वाहतुक ठप्प झाली आहे. आज दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घाट रस्त्यात दरड कोसळली. मातीचा ढिगारा आणि दगड रस्त्यावर आले. त्यामुळे कोल्हापूर हून सिंधुदुर्गच्या दिशेने आणि सिंधुदुर्गातून कोल्हापूर च्या दिशेने दुतर्फा होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान फोंडाघाट रस्त्याचे दुपदरीकरण काम सुरू असून ठेकेदार निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या यंत्रणेने तात्काळ रस्त्यावर आलेली दरड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू केले आहे. रात्री साधारण 11 वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.











