बांदा (प्रतिनिधी) : बांदा चेकपोस्ट येथे पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत 12 लाख 22 हजार रुपये किमतीचा गोवा बनावटीचा विदेशी दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी दोघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवार 28 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद पंडित पाटील हे चेकपोस्टवर कर्तव्यावर असताना त्यांनी इनोवा क्रिस्टा (MH 12 SF 1056) गाडीची तपासणी केली. गाडीमध्ये विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या दारूने भरलेले 20 बॉक्स आढळले. एकूण 516 बाटल्या व 10 लाखांची गाडी असा 12,22,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शुभम मुरलीधर बिरादार, वय 27, रा. हेरंभ, देवणी, जि. लातूर. मूळ रा. बिदर, कर्नाटक. अजय विनायक सांगळे, वय 26, रा. आरवली, ता. वेंगुर्ला. बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करताना मिळून आल्याने बांदा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 0080/2026 नुसार दि. 29 जून रोजी पहाटे 01:38 वा. गुन्हा नोंद करण्यात आला. तपास PN/1213 नाईक करीत आहेत.
पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नवोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली API पंकज शिंदे, ASI नाईक, HC कानडरकर, HC परब, PC प्रसाद पाटील व राजाराम कापसे यांनी ही कारवाई केली.










