सेवानिवृत्त शिक्षिका मंजिरी आपटे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कै. मंजिरी मनोहर आपटे, ( वय ७२ ) रा. मूळ वर्दे, सद्या राहणार ओसरगाव तलाव, ता. कणकवली यांचे बुधवार २४ जून रजी ठाणे येथे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांनी ज्ञानदीप विद्यालय हिवाळे, ता. मालवण या प्रशालेत २९ वर्षे मराठी विषयाच्या अध्यापिका म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली. विद्यार्थी प्रिय शिक्षिका अशी त्यांची प्रशालेत विशेष ओळख होती.

प्रसिद्ध ज्योतिषी व पुरोहित मनोहर आपटे यांच्या त्या पत्नी, मुंबई येथे आय. टी. क्षेत्रात काम करत असलेले निखिल आपटे यांच्या त्या मातोश्री तसेच मालवण पाॅलिटेकनीक काॅलेज मधील प्रा.संदेश जोशी यांच्या त्या सासूबाई होत्या.

त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, मुलगी, जावई, नात असा परिवार आहे.

error: Content is protected !!