पीएसआय अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली मोहीम फत्ते
कणकवली (प्रतिनिधी) :तालुक्यातील नडगीवे गावात घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम लुटणाऱ्या KTM नानावत गॅंगचा पर्दाफाश एलसीबी सिंधुदुर्ग ने केला असून टोळीचा म्होरक्या परदुम सिलोन नानावत ( वय 29 वर्षे, रा.घोटावडे, ता.मुळशी, जिल्हा पुणे ) याला गजाआड केले आहे. ही कारवाई एसपी डॉ दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक साटम यांच्या सूचनेनुसार, एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली 29 रोजी करण्यात आली. 9 जुन 2026 रोजी नडगीवे गावात नानावत गॅंग जे घरफोड्या करून धुमाकूळ घातला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास कणकवली पोलिसांसोबत एलसीबी सुद्धा करत होते. दरम्यान हि घरफोडी KTM नानावत गॅंग ने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. गोपनीय माहितीच्या आधारे पीएसआय हाडळ व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यानी चोरांच्या मागावर पुणे गाठले. यवत पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचून KTM गॅंग चा म्होरक्या परदुम नानावत याला कुसेगाव पडवी परिसरातून पकडले.या कारवाईत हवालदार विल्सन डिसुझा, हवालदार आशिष जामदार, हवालदार जॅक्सन घोंसालवीस, कॉन्स्टेबल ऋषिकेश टोपले, कॉन्स्टेबल अमर कांडर सहभागी झाले होते.











