रणजित देसाईंची नेरूर येथील इनडोअर स्पर्धेत तुफान फटकेबाजी

कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ येथील नेरूर सुखकर्ता हॉल या ठिकाणी गेले ३ दिवस सुरू असलेल्या पियुष नेरूरकर मित्र मंडळ आयोजित विशाल सेवा फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ३ दिवसीय स्पर्धेदरम्यान आज रणजित देसाई यांनी भेट देत आज फायनलच्या प्रथम संघाची नाणेफेक करत स्पर्धेला सुरुवात करून दिली. तसेच स्पर्धे दरम्यान स्वतः रणजीत देसाई यांनी बॅट हातात घेत षटकारांची तुफान बाजी केली. आणि ग्रामपंचायत सदस्य संदेश नाईक यांनी देखील बॅटिंगचा आनंद घेतला.

error: Content is protected !!