काचा फोडणाऱ्याचा शोध घेऊन दाखवणार पोलिसी खाक्या
पीआय अतुल जाधव यांची माहिती
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले कॅम्प परिसरातील त्या सलून मध्ये चोरी झालेली नाही, मात्र सलून च्या काचांची तोडफोड झाली आहे.सलून चा मालक आणि सध्याचा चालक यात त्या सलून च्या मालकीवरून वाद सुरू आहेत.त्यातूनच काचा फोडल्याची शक्यता आहे. मालकी वादामुळे त्या सलून ला शटर नाही आहे.सलून चा दर्शनी भाग हा उघडा असतो. केवळ दरवाजाला कुलूप असते. त्यामुळे काचा फोडणाऱ्याने खोडसाळ पणे स्वार्थी बुद्धीने हेतुपुरस्सर हे कृत्य केले आहे अगर कसे ? याचा तपास पोलीस घेणार आहेत.जर खोडसाळ पणे जाणूनबुजून हे कृत्य केले असेल तर त्याला पोलिसी खाक्या दाखवणार अशी माहिती वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.











