ट्रॅप कॅमेरा बसवून वनविभागाची रात्रीची गस्त सुरू
कणकवली (प्रतिनिधी) : तळेरे, वाघाचीवाडी येथे गुरुवार दिनांक -05 नोव्हेंबर रोजी रात्री च्या सुमारास संतोष लाड हे दुचाकीने घरी जात असताना बिबट्या अचानक समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले बाबत माहिती मिळाली असता दिनांक – 5 नोव्हेंबर रोजी वनविभागाचे कर्मचारी व जलद कृती दल कणकवलीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसेच, तळेरे, वाघाचीवाडी येथे वनविभागामार्फत ट्रॅप कॅमेरा बसवून रात्र गस्तही कायम सुरू करण्यात आली आहे. दिनांक – 10 नोव्हेंबर रोजी तळेरे पोलीस पाटील मोहन भोगले, निलेश पवार, राजेश भोगले व इतर ग्रामस्थ यांच्या समवेत वनविभाग, जलद कृती दलाचे सदस्य यांनी वाघाच्यावाडीत चर्चा करून वाघाचीवाडी तलाव परिसरात तसेच बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात फिरुन पाहणी केली. तसेच ग्रामस्थांना आवश्यक त्या सूचना देऊन सतर्क राहण्याचे आवाहन केले. व रात्री वनविभागामार्फत गस्त चालू राहणार असल्याची माहिती दिली.














