मुंबई वरळी बी. डी. डी. वासियांची भव्य रांगोळीतून कृतज्ञता व्यक्त

प्रसिद्ध रांगोळीकार मनीष भालेकर यांनी साकारली भव्य रांगोळी

खारेपाटण (प्रतिनिधी) : अनेक वर्षां पासून हक्काच्या घराचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या बीडीडी चाळकरांच्या आयुष्यात पुनर्विकासाच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर वरळी येथील बाळासाहेब ठाकरे गृहनिर्माण संकुलातील ‘जी’ विंग येथे प्रसिध्द रांगोळीकर मनिष भालेकर मुळगाव चिंचवली, सिंधुदुर्ग यांनी दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावर भव्य रांगोळी साकारली आहे.

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असल्याचा आनंद या कलाकृतीतून व्यक्त करण्यात आला आहे. तर या रांगोळी द्वारे या प्रकल्पामुळे अनेक पिढ्यांपासून जुन्या चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना नव्या घरांची आशा निर्माण झाली आहे असे दर्शविले आहे.त्यामुळे रहिवाशांच्या भावना,आनंद आणि नव्या भविष्याची अपेक्षा या रांगोळीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न रांगोळीकर मनिष भालेकर यांनी केला आहे. या रांगोळीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे चित्र रेखाटून विद्यमान सरकारचे धन्यवाद मानण्यात आले आहे. ही रांगोळी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. केवळ कलाविष्कार न राहता, बीडीडी चाळकरांच्या हक्काच्या घराच्या स्वप्नाशी जोडलेल्या भावनांचे प्रतीक म्हणून या रांगोळीकडे पाहिले जात आहे. तर प्रसिद्ध रांगोळीकार मनीष भालेकर यांच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!